नांदेड| गोवर्धन घाट पुलावरुन गोदावरी नदीपात्रात उडी घेतलेल्या एकाचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा उपाध्यक्ष बलजितसिंघ बावरी यांनी जीवरक्षक दलाच्या मदतीने प्राण वाचविले.


शहरातील गोवर्धनघाट पुलावरुन आज दुपारी दोनच्या सुमारास कंधार तालुक्यातील हाळदा येथील पांडूरंग विठ्ठल सुसटेवाड यांनी गोदावरी नदीपात्रात उडी घेतली. पूर सदृष्य परिस्थितीमुळे जीवरक्षक दल गोदावरी नदी पात्रात तैनात असल्याने जीवरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने पांडूरंग सुसटेवाड यांना बाहेर काढले.


यावेळी याठिकाणी असलेल्या रुग्ण संरक्षण समितीचे मराठवाडा उपाध्यक्ष बलजितसिंघ बावरी यांनी तातडीने जीवरक्षक दलाच्या मदतीने पांडूरंग सुसटेवाड यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने सुसटेवाड यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती हाळदा येथील सरपंच यांना देखील देण्यात आली.




