Wednesday, May 13

Himayatnagar close ; 17 ऑगस्ट शनिवारी वाढोणा ( हिमायतनगर) शहरासह संपूर्ण तालुका बंद -NNL

नांदेड। बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांकडून होत असलेल्या अत्याचार विरोधात दि 17 शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी हिंदू म्हणून जात पात विसरून या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

मागील काही दिवसात बांगलादेशात विचित्र परिस्थिती उद्भवली आणि तेथील सरकारला पायउतार व्हावे लागले. हीच संधी साधून बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार केले आणि करत आहेत. हिंदूंचे जीवन नरकमय झाले आहे. हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत. हे पाहून भारतातील हिंदू समाज प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

या सर्व अत्याचाराच्या विरोधात दिनांक 17 ऑगस्ट वार शनिवारी वाढोणा ( हिमायतनगर ) शहरासह वाढोणा तालुका बंदचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येत आहे. 17 ऑगस्ट रोज शनिवारी सर्वांनी आपआपली प्रतिष्ठाने, सर्व प्रकारची दुकाने , शैक्षणिक संस्था , कोचिंग क्लासेस, हॉटेल , भाजी फळ मार्केट , ॲटो युनियन सर्वांनी आपले व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवून बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!