हिमायतनगर| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा खुर्द येथे डिसेंबर महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तसेच सेवानिवृत्त व पदोन्नत मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी सर यांचा सेवापूर्ती सोहळा १० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ ॲड. सत्यनारायण जाधव साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंडित तळेगावकर, केंद्रप्रमुख पोटा संकूल श्री दिलीपराव जाधव, श्रीमती सुनिता संगेवाड मॅडम, मा. मु.अ. पोटा बु. श्री बामनाजी कदम, एन.एस. गायकवाड, नामदेव राठोड सर तसेच निरोपमुर्ती दीपक कुलकर्णी सर उपस्थित होते. पोटा केंद्रातून बदली झालेले सर्व शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

शिक्षण परिषदेत सुलभक मोरे सर, श्रीमती कांबळे मॅडम, हनमंत जाधव सर यांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


पारवा खुर्द व पारवा गावच्या वतीने निरोपमुर्ती दीपक कुलकर्णी सर तसेच बदली झालेल्या सर्व शिक्षकांचा भावनिक व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील मान्यवर राजू पाटील जाधव (सर्पंच प्रतिनिधी), भगवानराव जाधव (उपसरपंच), तुकाराम जाधव (तंटामुक्ती अध्यक्ष), बंडू पाटील, पुंडलिक पवार (माजी सरपंच), गणेश मानकरी, संजयराव जाधव, शा.व्य. समिती अध्यक्ष शेख ईमाम, उपाध्यक्ष पंजाब महामुने आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री पंडित तळेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री जयवंत पतंगे यांनी तर आभारप्रदर्शन श्री पांडुरंग माने सर यांनी केले. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव, स्नेहभावाने भरलेला निरोप आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून समृद्ध अशा या कार्यक्रमाने पारवा खुर्द परिसरात आदर्श उभारला.

