Homeक्राईमऑपरेशन फ्लश ऑऊट येळी महाटी शिवारातील छाप्यात ; दोन कोटी वीस लाख...

ऑपरेशन फ्लश ऑऊट येळी महाटी शिवारातील छाप्यात ; दोन कोटी वीस लाख रुपयांची अवैध रेती उपसावर धडक कार्यवाही, मुद्देमाल जप्त

उस्माननगर l उस्माननगर पोलिस, मुदखेड पोलिस , आणि महसूल पथकाने येळी महाटी शिवारातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या गोदावरी नदीलगत असणारे सीता नदीमध्ये सात मोठे लोखंडी फायबर बोट व तीन छोटे लोखंडी इंजन बोट आणि आरोपीसह दोन कोटी वीस लाख रुपयाचा मुद्देमाल पंचाक्षम जिलेटीनच्या सहाय्याने जागीच नष्ट केला, ही धडक कारवाई उस्मान नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व मुदखेड व महसूल पथकाची संयुक्त कार्यवाही करण्यात यश आले असून उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि संजय निलपत्रेवार ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत.त्यामुळे परिसरात अवैध रेती माफियावर धडकी भरली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मा.श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंर्तगत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेतीचा चोरटा उपसा करुन वाहतुक व विक्री करणारे इसमायिरुय्द कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने दिनांक 10/12/2025 रोजीचे 07:00 या पोलीस स्टेशन उस्माननगर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय निलपत्रेवार हे पोलीस स्टेशन उस्माननगर येथील व पोलीस स्टेशन मुदखेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व महसुल विभागाचे मा. तहसीलदार श्री परळीकर, त्यांच्यासोबत सज्ज मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी यांचेसह मिळालेल्या माहीतीवरुन येळी शिवारातील गोदावरी नदीत अवैध रेती उपसाकरणारे यांचेविरुध्द छापा मारणे कामी गेले असता तिथे काही इसम विनापरवाना लोखंडी मोठे फायबर बोट च छोटे लोखंडी इंजीनबोटच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातुन रेतीचा (गौण खनिज) अवैच्य रित्या उपसा करीत असताना दिसुन आले पोलीस पथकास पाहुन सदर इसम पळून गेले. महाटी शिवारातील गोदावरी नदीलगत असणारे सितानदीमध्ये घटनास्थळावर सात मोठे लोखंडी फायबर बोट किमंती 1,75,00000/- व तीन छोटे लोखंडी इजीन बोट किमंती 45,00000/-असा एकुण किमंती 2,20,00000/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

त्यानंतर महसुल विभागाचे अधिकारी मा. तहसीलदार श्री परळीकर यांनी सदर लोखंडी मोठे फायबर बोट व छोटे लोखंडी इंजीन बोट मालक व चालक यांनी शासनाची परवानगी घेतलेली नसल्याचे सांगीतले वरुन सदर ठिकाणी रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची खात्री झाल्याने त्याबाबत महसूल विभागाचे अधिकारी यांनी आमचे समक्ष सदर साहीत्याचा पंचासमक्ष रितसर पंचनामा करुन सदरचा मुद्देमाल हा जिलेटीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला आहे.

सदर लोखंडी फायबर व लोखडी छोटे इंजीन बोट च्या मालकांची माहीती घेवुन त्यांचेविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रकीया चालु आहे. उस्माननगर व मुदखेड पोलीस पथकाने अवैध रेती उपसा करणारे इसमांवर कारवाई करुन उत्कृष्ठ कामगीरी केल्याने मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करुन अभिनंदन केले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments