Defense of OBC reservation : भोकर येथे १८ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन -NNL

भोकर। नांदेड जिल्हा सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भोकर येथे दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते मा.प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दि.५ ऑगस्ट रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.


यावेळी ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, माधवराव अमृतवाड, सतीश देशमुख,अॅडो. शेखर कुंटे,संदीप पाटील गौड, अॅड.परमेश्वर पांचाळ,सुरेशराव बिल्लेवाड,विठल फुलारी, बि.आर.पांचाळ, निळकंठ वर्षेवार,संतोष मारकवार,आनंदराव डांगे,संजय घंटलवार, सुभाषराव नाईक,आप्पाराव राठोड, दिलीपराव सोनवडे,पांडुरंग वर्षेवार,मोहन लिंगमपल्ले, श्रीकांत दरबस्तवार, रामदास सोनवडे आदिसह अनेकांची उपस्थिती होती.




