भोकर l केंद्र शासन व राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शना नुसार व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज दि. २५ सप्टेंबर रोज गुरुवारी आरोग्य शिबीर संपन्न झाले.


या कार्यक्रमासाठी भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण ह्या येणार होते सध्या पूर स्थिती व पूर ग्रस्त भागात भेटीचे नियोजन असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व श्री भगवान दंडवे भोकर भाजपा तालुका समन्वयक हे कार्यक्रमसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, प्रमुख उपस्थिती दिवाकर रेड्डी भाजपा तालुकाध्यक्ष विशाल माने, डॉ राम नाईक माजी नगरसेवक, खाजगी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ फेरोज इनामदार, डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ साईनाथ वाघमारे, डॉ पांचाळ, राजेश्वर रेड्डी लोकावाड अध्यक्ष भोकर केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, मिर्झा ताहेर भाई अल्प संख्यक अध्यक्ष, पत्रकार, विविध राजकीय पदाधिकारी, नांदेड येथील विशेष तज्ञ डॉ अर्चना निलमवार नेत्ररोग, डॉ ठक्कवाड मानसिक आरोग्य तज्ञ, डॉ मुनेश्वर स्त्रीरोग तज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.



प्रथम धन्वंतरी पुजन, दिप प्रज्वलन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत दंत शल्य चिकित्सक डॉ. मायादेवी नरवाडे यांनी अवयव दानाची प्रतिज्ञा वाचन केली व सर्वांनी अवयव दान प्रतिज्ञा घेतली.


या आरोग्य शिबिरात महिलांचे रक्तदाब, मधुमेह, दंत रोग, नेत्र रोग, स्तन व गर्भाशय, मुख व मुख कर्क रोग तपासणी, गरोदर महिलांसाठी लसीकरण सेवा, सोनोग्राफी, हिमोग्लोबिन तपासणी, क्षय रोग तपासणी, सिकलसेल आजार, रक्तक्षय तपासणी, पोषण आहार मार्गदर्शन, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड काढणे, अवयवदान नोंदणी, रक्तदान शिबीर, लहान बालकांची तपासणी विशेष तज्ञ डॉक्टर यांच्या कडून तपासणी करण्यात आली.


क्षयरुग्ण यांना पोष्टिक आहार किट चे मान्यवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत बालकांची ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या मध्ये प्रथम रक्तदान महिला श्रीमती जिजा भवरे अधिपरीचारिका यांनी केले व एकूण १६ रक्तदान दाते यांनी रक्त दान केले. एकूण नोंदणी व तपासणी ३९० रुग्णांची करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ” स्वस्थ नारी, सशक्त्त परिवार ” अभियानचे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता भालके यांनी केले, सूत्रसंचालन डॉ विजया किनीकर, सत्यजीत टिप्रेसवार, आभार प्रदर्शन डॉ शिल्पा कळसकर यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, क्षयरोग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, राम रतन नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. भोकर शहर व परिसरातील महिला व बालकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले.


