किनवट, परमेश्वर पेशवे| टी.ई.टी.परिक्षेतील यापूर्वीचे घोटाळे पाहता पात्र व गरिब विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये म्हणून हि परिक्षाच बंद करावी अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या शिक्षण सचिवा सह, शिक्षण आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात तलवारे यांनी म्हटले आहे की,टी.ई.टी.परिक्षा घोटाळ्यात आय.ए.एस.अधिकारी सुशील खोडवेकर, परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह पन्नास च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते.नंतर हे सर्वजण जमानतीवर सुटले व त्यांना पुन्हा मुळ पदांवर आस्थापना देण्यात आली.
सद्या नीट परिक्षेचा मुद्दा देशभरात गाजत आहे.कोणत्याही पात्रता परीक्षेत घोटाळा हा जणू ठरलेलाच आहे असे समीकरण झाले आहे.सद्या शासन शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत जी माहिती देत आहे त्यात प्रचंड तफावत आहे.नव्याने टी.ई.टी.व्दारे शिक्षक भरती होत आहे म्हणजे पुन्हा भ्रष्टाचाराला रान मोकळे झाले आहे.
वास्तविक डी.एड.च्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांत सुक्ष्म पाठ, सेतू पाठ,सराव पाठ,छात्र सेवाकाल, प्रात्यक्षिके, शिबिरे त्यानंतर वार्षिक परीक्षा म्हणजेच विद्यार्थी अगदी तावुन -सलाखुन बाहेर पडतो त्यामुळे शिक्षक भरती करताना गुणपत्रिकेनुसार गुणवत्ता यादी तयार करून भरती करावी म्हणजे घोटाळे होणे बंद होईल व गरिब आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असे म्हटले आहे तसेच टी.ई.टी.घोटाळ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी हि सिध्दार्थ तलवारे यांनी केली आहे.