नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्यावरील व कारला शिवारातील जवळपास दिड ते दोन हजार एकर जमीन खरेदी करून टाटा पॉवर कंपनीकडून या ठिकाणी सोलार पॅनलचा प्रकल्प तयार केला गेला. सदरील जमिनी वर सिमेंट कांक्रेट बांधकाम झाले असल्याने या जमिनीत मुरणारे सर्व पाणी कारला शिवारात जात असुन, पुराचा ओघ वाढत असल्यामुळे दोन दिवसांपासून नाल्यांना पूर वाहू लागला आहे.यामुळे सर्व जमिनी खरडून गेल्या असुन यास टाटा पॉवर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


हिमायतनगर तालुक्यातील गेल्या तिन दिवसांपासून अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशा उद्ध्वस्त झाले आहेत.यातच बोरगडी कारला शिवारात टाटा पॉवर कंपनीकडून मोठा सोलार प्रौजेक्ट उभारण्यात आला आहे.या सोलार मध्ये जमिनी दिल्या त्या जमिनीतील पाणी जागेवर मुरत होते. तसेच सर्व कट्टे फोडून जमीन सपाट करण्यात आल्याने पाणी थांबण्यास जागा उरली नाही. तसेच सदरील सोलारच्या ठिकाणी जमिनीवर सिमेंट कांक्रेट बांधकाम केले असल्यामुळे या हजारो एकरातील पाणी कारला गावाकडे वळण घेऊन नाल्यांच्या पुराची पातळी ओलांडली आहे.


अगोदर पावसाची गती कमी होती परंतु गेल्या दोन वर्षांपासून या सोलार कंपनीच्या शेत जमिनीतील पाण्यामुळे कारला शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन कापूस, सोयाबीन,हाळद,तुर इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. याबाबतीत शेतकऱ्यांनी टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले होते उन्हाळ्यात नाला सरळीकरण करून बंधारे बांधून देण्यात येणार असल्याचे सांगून काडता पाय घेतला.


त्यामुळे यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आज पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली असुन दोन दिवसांपासून पुराची परिस्थिती जैसे थे अवस्थेत आहे.नाल्यांना पूर वाहू लागला नाल्या काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत.सदरील टाटा पॉवर सोलार कंपनीकडून कारला गावातील नाल्यांची दुरूस्ती करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


