नांदेड| जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार कृपाछत्र उपक्रमाच्या ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा व लायन्स तर्फे ठेवण्यात आले असून देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.


भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कृपाछत्र हा उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यात जागोजागी अतिवृष्टी होत असून गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घेऊन शंभर टक्के लोकसहभागातून खऱ्या गरजूंना छत्र्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना छत्री वाटप करण्यात येते.आता पर्यंत १९४
छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत.त्यामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ५० तर हॉटेल मिडलँड गोकुळनगर नांदेड यांच्यातर्फे ३२ छत्र्या मिळाल्या आहेत. प्रत्येकी १६ छत्र्या देणाऱ्या मध्ये प्रमिला महेश भालके, कै.आशुतोष भाकरे यांच्या स्मरणार्थ डॉ. गोविंद भाकरे,एक राम भक्त,अशोक विठ्ठलराव पडगीलवार,स्वर्गीय पुष्कर राज जायसवाल हैदराबाद यांच्या स्मरणार्थ स्नेहलता जायसवाल, रुहिका रूपेश मुत्तेपवार, स्वर्गीय उर्मिला देवी जायसवाल हैदराबाद यांच्या स्मरणार्थ स्नेहलता जायसवाल यांचा समावेश आहे .


छत्र्या घाऊक बाजारातून मधून खरेदी करण्यात येत असून दोन्ही बाजूला नाव छपाईच्या शुल्कासह किमान १६ छत्र्यासाठी रू.२५०० देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे त्याच देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी १८३० छत्र्यांची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन भाजपा नांदेड महानगर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.




