Samarasata Sahitya : समरसता साहित्य संमेलनाला नांदेडमध्ये भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ
नांदेड, श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्य नगरी | समरसता हा जगण्याचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक असते. समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारे, समाजनिष्ठ साहित्य निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच भारत हे अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकते. यासाठी व्यापक प्रमाणावर समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. समरसता साहित्य संमेलनामधून सामाजिक समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अनुबंध निर्माण होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी नांदेड येथील विसाव्या समरसता साहित्य संमेलनात व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने नांदेड येथे विसावे समरसता साहित्य संमेलनाला सकाळी आठ वाजता भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ...
