नांदेडराजकीय

Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वबळावर लढत देऊन आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली असून, गटाचे तीन उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या नेत्याला प्रचारासाठी न बोलावता स्थानिक जनतेच्या विश्वासावर ही लढत जिंकत ठाकरे गटाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ यांच्यासह आठ नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून सरदार खान हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

IMG 20251226 084514 Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी
Oplus_16908288

 

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर प्रभावी संपर्क, संघटनशक्ती आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर विजय मिळवला. माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या पत्नी सुचिता राठोड, विठ्ठलभाऊ ठाकरे आणि जिशान मिर्झा यांनी मताधिक्याने विजय मिळवत ठाकरे गटाची स्वतंत्र ओळख ठळक केली आहे.

या निकालामुळे हिमायतनगरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व कायम असले तरी उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर लढत मिळवलेले यश आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!