नांदेडसोशल वर्क

Dr. Babasaheb Ambedkar Park ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे पदाधिकारी यांनी स्वखर्चाने वाचन कट्टायाची केली सुरूवात..

नवीन नांदेड l डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे पदाधिकारी यांनी स्वखर्चाने वाचन कट्टा सुरू केला असुन या ठिकाणी सर्व दैनिक सकाळी उपलब्ध करून दिले असून जेष्ठ नागरिक, युवक यांनी दैनंदिन पेपर वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पदाधिकारी यांनी केले आहे.

दिनांक २२ जून २५ रोज रविवारी वर्तमानपत्र वाचन कट्टयाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे सकाळी वंदनेस आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आला,परिसरातील सामाजिक, राजकीय, शासकीय घटना घडामोडी विविध माध्यमातील वृत्तपत्रातुन वाचण्यात याव्यात ही बाब लक्षात घेऊन शुभारंभ पदाधिकारी यांनी स्वखर्चाने केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे, राजू लांडगे, प्रसेनजीत वाघमारे, प्रदीप हनवते,आकाश सोनकांबळे, भगवान वाडे, बबन गायकवाड, अशोक वाडे, रामचंद्र जमदाडे,पांडुरंग वाडे, सूर्यकांत सोनसाळे, रामराव सरपाते, अरविंद जोंधळे, सुनील वडगावकर, बालाजीगायकवाड, हरी कसबे इत्यादींची उपस्थिती होती. तर यावेळी हा वाचन कट्टा हा स्वखर्चाने सहभागातून हा कट्टा चालवण्याच्या निर्णय घेण्यात आला, यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी वृत्तपत्र वाचन कट्टयास स्वखर्चाने रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे .

या वाचन कट्टा मध्ये दै.पुण्यनगरी, रा दै. गोदातीर समाचार,दै.सत्यप्रभा, दै. प्रजावाणी, दै.सम्राट, दै.देशोन्नती, दै.तरूण भारत,दै. लोकमत यासह विविध दैनिक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परिसरातील जेष्ठ नागरिकांनी,युवक‌ व वाचक वर्गाने वाचन कट्ट्याचा लाभ घ्यावा अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको यांच्यावतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!