नांदेडमहाराष्ट्र

A grand tricolor rally : येरगीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली संपन्न; संपूर्ण गाव सामील

देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील येरगी मध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सामील झाले होते.

सकाळी ८ वाजता गावातील हनुमान मंदिर पासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅली मध्ये भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, सरपंच संतोष पाटील, मरखेल पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आर.एम.हुंडेकर, बालिका पंचायत राज समितीचे सर्व पदाधिकारी ,गावातील महिला पुरुष,लहान बालके,शालेय विद्यार्थी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान मंदिरापासून रॅली सुरुवात होऊन गावातील प्रत्येक रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीत भारत माता की जय,भारतीय सैनिकांचा विजय असो,अशा घोषणांनी येरगी गाव दुमदुमले होते. तसेच देशभक्तीपर गाण्याच्या चालीवर रॅली काढण्यात आली. शेवटी रॅली गावातील प्रमुख रस्त्यावरून पुन्हा हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली.

तत्पूर्वी तेथे पोलिस निरीक्षक आर. एम.हुंडेकर, भाजपा, सरपंच संतोष पाटील, डाॅ.किरण ठाकरे, मुख्याध्यापक अशोक देवकत्ते, ईश्वर वाडीकर, तंटामुक्त अध्यक्ष, शालेय समिती अध्यक्ष, बालिका पंचायत राज समितीच्या उपसरपंच पुनम सूर्यवंशी, सचिव महादेवी दाणेवार, यांनी भारतीय सैनिकांच्या प्रति आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ईरन्ना भुरळे यांनी केले. गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थितीत होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button