Tuesday, June 30

Tag: A grand tricolor rally was held

A grand tricolor rally : येरगीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली संपन्न; संपूर्ण गाव सामील

A grand tricolor rally : येरगीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली संपन्न; संपूर्ण गाव सामील

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील येरगी मध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सामील झाले होते. सकाळी ८ वाजता गावातील हनुमान मंदिर पासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅली मध्ये भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, सरपंच संतोष पाटील, मरखेल पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आर.एम.हुंडेकर, बालिका पंचायत राज समितीचे सर्व पदाधिकारी ,गावातील महिला पुरुष,लहान बालके,शालेय विद्यार्थी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान मंदिरापासून रॅली सुरुवात होऊन गावातील प्रत्येक रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीत भारत माता की जय,भारतीय सैनिकांचा विजय असो,अशा घोषणांनी येरगी गाव दुमदुमले होते. तसेच देशभक्तीपर गाण्याच्या चालीवर रॅली काढण्यात आली. शेवटी रॅली गावातील प्रमुख रस्त्यावरून पुन्हा हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली....
error: Content is protected !!