Rashtrasant Shivacharya Maharaj : राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने शिवकीर्तन भव्य सोहळ्याचे आयोजन -NNL

नवीन नांदेड| वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चतुर्थ संजीवन समाधी उत्सवा निमीत्त भव्य कीर्तन सोहळा ०१ सप्टेंबर २४ रविवार सकाळी ठिक ११.वा शिवलिगेश्वर मंदिर सिडको येथे आयोजित करण्यात आला आहे.

प.पु. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज दि. १ सप्टेंबर २०२० (शिवरात्री) रोजी लिंगैक्य झाले, माऊलींनी १०४ वर्षे आपले आयुष्य समाजासाठी अहोरात्र झिजविले. सामाजिक अध्यात्मिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यात अलौकीक योगदान दिले. प.पु. गुरुमाऊली देहरुपाने जरी आज आपल्या मध्ये नसले तरी त्यांनी दिलेले ज्ञान, शिकवण आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे. त्याकरीता या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

दिव्य-सानिध्य प.पु. गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ (राजुर) अहमदपुर यांचे अमृतोपदेश ०१ सप्टेंबर २०२४ रोज रविवारी सकाळी ठिक ११ वाजता शि.भ.प. रजनीताई मंगलगे गंगाखेड (सुप्रसिध्द किर्तनकार व गुरुदेव या चरित्रपर पुस्तकाच्या लेखिका) यांचे शिवकीर्तन व सुप्रसिध्द गायीका गोदावरीताई मुंडे गंगाखेड यांची गायनसाथ मंगलारती नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, या सोहळ्यात भजनी मंडळ वीरवैरागिनी अक्का, महादेवी महिला भजनी मंडळ हडको, सिडको हडको, बसवेश्वरनगर कौठा, रामनगर नांदेड, उस्माननगर, शिराढोण, दगडगाव नांदेड सहभागी होणार आहेत, या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रसंत सद्‌गुरु शिवलिंग शिवचार्य सद्भक्त मंडळी सिडको हडको, जिंदमनगर नविन नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button