नांदेडराजकीय

Ardhapur Taluka Congress : राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – अर्धापूर तालुका काँग्रेसची मागणी

नांदेड| यावर्षीच्या खरिप हंगामात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे सतत पुराने थैमान घातले पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.सर्वत्र शेती व पिके जलमय झाले.जमिनी रखडल्याने पुढच्या कांहीं वर्षे पिक येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे अतोनात नुकसान झाले आहे.अश्या संकटात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पिक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,केळीचे नुकसान झाले त्यांनी सोयाबीन पेरणी केली तेही पेरणी गेली त्यांचे नावे नोंदवून घ्यावी तसेच शक्ती पीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने आज रोजी बुधवारी अर्धापूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती उर्फ पपू पाटील कोंढेकर, अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. राज्यात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी,ओला दुष्काळ जाहीर करावा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, कोल्हापूर धर्तीवर नुकसान भरपाई द्यावी सरसकट विमा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जोरदार घोषणाबाजी करुन सरकार जागे व्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना देण्यात आले.

कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती उर्फ पपू पाटील कोंढेकर, तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, जिल्हा प्रवक्ता सुभाष लोणे, अर्धापूर तालुका प्रभारी डॉ उत्तमराव इंगळे,माजी जि.प.सदस्य प्रल्हादराव सोळंके ,माजी उपनगराध्यक्ष मिर्झा अख्तर उल्ला बेग, दत्तराव देशमुख लहानकर, बळीराम पा हाट्टेकर, बालासाहेब देशमुख आंबेगावकर,कृउबा संचालक ज्ञानेश्वर राजेगोरे, तालुका सरचिटणीस शेख मकसूद, म.इब्राहिम, पृथ्वीराज लोणे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रविन्द्र डाढाळे,अनु.ज.सेल तालुकाध्यक्ष एड.नितीन लोणे,म.अय्याज, भिमराव सरोदे, मुन्ना भाऊ देशमुख, शबाना बेगम, सदाशिव कपाटे, महेन्द्र सरोदे,एड गौरव सरोदे,एड.मंगेश सरोदे,म.गौस कुरेशी, फिर्दोस पठाण,बेगाजी मरकुंदे,भागवत कदम,रंजित देशमुख,फेरोज पठाण,प्रकाश सरोदे, शादूलभाई नागेलीकर,बाळु पाटील, साईनाथ जाधव, मारोतराव दुधमल,मनोज कदम , कैलास कपाटे, गणेश सिरसागर, ज्ञानदेव देविदास,बालाजी देवराव ,नागेन्द्र जोंधळे, अर्जुन पाटील आदी कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न व परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली सरसकट कर्जमाफी करावी,ओला दुष्काळ जाहीर करणे व सरसकट मदत आवश्यक आहे मदतीशिवाय शेतकरी जगू शकणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी जाणीव ठेवून मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button