नांदेडराजकीय

Panchayat Samiti Chairman : जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
भोकर- अनुसूचित जाती (महिला),
हिमायतनगर- अनुसूचित जाती,
किनवट- अनुसूचित जाती,
उमरी- अनुसूचित जमाती,
मुदखेड- अनुसूचित जमाती (महिला),
नांदेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
हदगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
नायगाव खै.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
लोहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
देगलूर- सर्वसाधारण (महिला),
मुखेड- सर्वसाधारण (महिला),
बिलोली- सर्वसाधारण (महिला),
धर्माबाद- सर्वसाधारण (महिला),
कंधार- सर्वसाधारण,
अर्धापूर- सर्वसाधारण
माहूर- सर्वसाधारण.

या सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित झाले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!