नांदेडलातूर

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता ‘महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी -NNL

संकतेस्थळावर 3 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार

लातूर| शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 19 जून 2024 पासून सुरु केलेली आहे. हे अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर 3 जुलै, 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाज्योतीमार्फत युपीएससी(UPSC) नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी(MPSC) राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी(MPSC) अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, बँकिंग, एलआयसी, रेल्वे परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणा बाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षाव्दारे करण्यात येणार आहे. .

महाज्योतीचे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणावर विहित कालावधीत अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी 0712-2870120/121 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button