कृषी क्षेत्रातही उत्तम ‘करिअर’असल्याचा संदेश जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवा : सिईओ -NNL
नांदेड,अनिल मादसवार| आपली बुद्धिमत्ता वापरून कल्पकतेने शेती केली तर या व्यवसायातून उत्तम असे करिअर निर्माण होऊ शकते. ज्या उच्चशिक्षित लोकांनी शेतीमध्ये स्वतःला झोकून दिले ते नोकरदारांपेक्षा अधिक चांगले जीवन जगत आहेत. शेतीत उत्तम करिअर आहे . मात्र या यशकथा जनतेपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज येथे व्यक्त केली.
नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. आज कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषीनिष्ठ शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना त...
