क्राईमनांदेड

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील पेवा गावाचे पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव ( वय 48) यांनी पेवा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी त्यानी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याच व्हिडीओ त्यांनी बनवला होता. या घटनेमुळे हदगाव तालूक्यात व नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आज पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक भडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. भडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असे मृत बालाजी हे व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे जो पर्यत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला. आणि हदगाव पोलिस स्टेशन समोर ठिय्या मांडल्या होत्या.

गेल्या पंधरा दिवसा पुर्वी पेवा या गावात एक गंभीर घटनेच्या संदर्भात गुन्हा हदगाव पोलिस स्टेशनला नोंद झाला होता. या पार्श्वभूमीवर पेवा गावात अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्वी घडलेल्या घटने बाबतीत पोलिस निरक्षक यांनी पोलिस पाटलांना माहीती संबधी जाब विचारला होता. या मध्येच दोघात काही तरी बोलचाल झाल्याने ते मयत पोलीस पाटलाना असह्य झाल्याने ही घटना घडल्याचे दिसुन येते. मयत पोलिस पाटील यांच्या मोबाईलची तपासणी त्याच्या नातेवाईक यांनी केली आसता हा प्रकार उघडकीला आला. मृत्यूपुर्वी व्हिडीओ बनवून आपल्या मृत्यास पोलिस निरक्षकच जबाबदार असल्याच व्हिडीओत असल्याची माहीती मिळाली. यानंतर मयतच्या नातेवाईक व गावकऱ्यानी पोलिस निरक्षकावर या संबधी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने उपविभागीय पोलिस आधिकारी व अप्पर पोलिस अधिक्षक यांनी भेट घेऊन मयताचे नातेवाईक व गावक-यांना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिस आधिक्षक नांदेड यांच्या आश्वासनानंतर नातेवाईक व गावकरी शांत झाले.

पोलिस व नागरिकांच समन्वय आवश्यक
हदगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस व नागरिकांच गेल्या दोन वर्षापासुन समन्वय नाही. परिणाम स्वरुप अश्या अप्रिय गंभीर घटना घडत आहेत. हदगाव पोलिस स्टेशनमध्ये यापुर्वी सामाजिक दृष्टिकोनातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पञकार, यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक व्हायच्या त्यांच्यातुन ऐखाद्या किचकट घटने संबधी चर्चा होऊन त्यावर मार्ग काढण्यात येत होते. परंतु अलिकडच्या काळात माञ तसे दिसुन येत नाही नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरक्षक सदाशिव भडीकर यांनी हदगाव पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला होता. पदभार घेवून त्याना महीना पण झाला नव्हता त्यांनी पण अल्पकाळात शहरात व परिसरात वाढत असलेली गुडागर्दी, रोडरोमीयो, शालेय परिसरात बिनकामी फिरत असलेल्या टवाळखोरावर चांगलीच जरब निर्माण केली. या दरम्यान ही अप्रिय घटना घडली.

अणखी विशेष म्हणजे हदगाव पोलिस स्टेशनचा विस्तार फार मोठा असुन, या पोलीस स्टेशन अतर्गत जवळपास 54 गावे आहेत. पोलिस कर्मा-याची मान्य पदापेक्षा पोलिसाची संख्या फार कमी आहे. या पोलिस स्टेशनची हद 60 किमीच्या जवळपास आहे. हे पोलिस स्टेशन विदर्भ व हिगोली जिल्हा सिमेवर आहे. हदगाव पोलिस स्टेशनला नवीन अधिकारी किवा पोलिस सहसा रुजु होण्यास उत्सुक नसतात हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button