नांदेडछत्रपती संभाजीनगरराजकीय

Graduate voter registration : पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर| भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे.

मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने स्विकारण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. परंतू विभागातील काही कार्यालयाकडून पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने न करता ऑनलाईन करण्यात यावेत असे सांगण्यात येत असल्याची तोंडी तक्रारी येत आहेत.

त्यामुळे, पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावेत, याबाबतची सूचना जिल्हास्तरावरुन सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button