‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविणे बाबतचे शासन परिपत्रक मार्चमध्ये येऊन धडकले आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. त्याला कारणही तसेच मजेशीर व गंमतीदार आहे असेच म्हणावे लागेल. या परिपत्रकानुसार दर शनिवारी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये प्रचलित वर्गांऐवजी दप्तराविना शाळा भरणार व विद्यार्थ्यांचा शनिवार हा वेगळ्या कार्यपद्धतीद्वारे आनंददायी व मनोरंजक स्वरूपाचा होणार आहे.
सध्याच्या काळात मुलांच्या हसण्या- खेळण्याच्या- बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना ताण, तणाव, उदासीनता व नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे; यावर उपाय म्हणून शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती आणि 14 मार्च 2024 रोजी निघालेल्या शासन परिपत्रकामुळे याची जणू परिपूर्तीच झाली. या ...
