Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेला होमगार्ड अनुषेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले होते. कार्यालयाच्या प्रशासकीय कारणास्तव या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.


कागदपत्रे पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणीसाठी अर्ज क्रमांकानुसार उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे बोलाविण्याचे सुधारित वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१php या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. के.ए.धरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.




