लाइफस्टाइल

Tirthadarshan Yojana camp ; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची नांदेड येथे मोठ्या थाटात सुरूवात! – NNL

नांदेड| नांदेड मध्ये आज वैद्य रूग्णालय परिसरात मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची मोठ्या थाटा माटात सुरूवात झाली.

.नांदेड जिल्हा विधी प्राधिकरणाच्या न्यायमूर्ती मा.दलजितजी कौर जज यांच्या शूभ हस्ते दीप प्रज्वलनाने तथा भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प माल्यार्पणाने, फेस्काॅमचे मराठवाडा उत्तर प्रादेशिक विभागाध्यक्ष मा.अशोकजी तेरकर यांच्या अध्यक्षतेखाली, नांदेड समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे व फेस्काॅम उत्तरविभागाचे निर्माते (संस्थापकाध्यक्ष) मा. सुभाष रावजी बार्‍हाळे व सौ.निर्मलाताई बार्‍हाळे,सर्व श्री माधवराव पवार,जयवंत सोमावाड, रामचंद्रजी कोटलवार,डाॅ.लक्ष्मी पुरण शेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकीळ,श्रीमति चौधरी, देगावकर, शिंदे, जिंतूरकर इ. च्या प्रमुख उपस्थितित आणि मोठ्या संख्येनी जमलेल्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षिनीं उद्घाटण सोहळा पार पडला!

.फेस्काॅमच्या प्रथेप्रमाणे सर्व स्वातंत्र्य वीर हुतात्मे तथा ज्ञात अज्ञात दिवंगत ज्येष्ठ नागरिकांच्या आत्म्यांस श्रद्धांजली आर्पण करून साने गुरूजींच्या “खरा तो एकचि धर्म” या कवितेच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली..प्रास्ताविकात डाॅ. हंसराज वैद्य यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकां साठींच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांबद्दल शासनाचे प्रथम धन्यवाद मानले व इच्छूक उपस्थितांना सर्वांनी सहभाग नोंदऊन या संधिचा फायदा घ्यावा असे आवाहान केले.ते म्हणाले की) हा सोहळा कालच जागतिक पातळीवर साजरा करण्यात आलेल्या ” 21 आॅगष्ट,जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या” पार्श्वभूमीवर होत आहे!

ज्येष्ठ नागरिक हे स्वातंत्र्या पासून ते आज तागायत “राष्ट्र निर्माते” तथा राष्ट्राचे खरे “शिल्पकार” आहेत.त्यांनी राष्ट्राला आज पर्यंत जग विख्यात स्वातंत्र्य वीर,यौध्ये, अंतराळ वीर,शिक्षक, संशोधक पत्रकार, उद्योगपती, शास्रज्ञ, ज्ञानी,गुणी कलावंत, क्रिडा पटू,नेते,अभिनेते, गायक, संगितकार,साहित्यिक, थोर तत्वव्यत्ते, संत, महंत, न्यायमूर्ती अदी दिलेले आहेत.राष्ट्र हितासाठी महान त्याग केलेला आहे!
राष्ट्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले तथा समर्पित केलेले आहे. खर्‍या अर्थाने ते राष्ट्राची संपत्ती आहेत!
म्हणून केंद्र व राज्य शासनांनी त्यांनां”राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषीत करणे अपेक्षित होते व आहे! त्यांचे कायम स्वरूपी रक्षण तथा सांभाळ करणार्‍या योजना अपेक्षित होत्या व आहेत.त्यांचे धोरण,2007चा पारित कायदा, 2010चे पारित नियम, 2013 च्या पारित कायद्यांची काटेकोर अंमलबजावनी,त्यांचे वय वर्ष साठ(60)च ग्रहाय धरले जावे.त्यांची संख्या व टक्का,योगदान व समर्पण लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सभाग्रहात मांडण्यासाठी एक ज्येष्ठ महिला व एक पुरूष्य विधान परिषदेवर व लोकसभेवर घेण्यात यावा.त्यांच्या साठी खास व विशेष अशी इतर शेजारिल आंध्रप्रदेश, कर्णाटक व तेलंगाना राज्याप्रमाणे प्रतिमहा 3500/- सन्मान धन तथा मानधन “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके माय बाप योजने”द्वारे द्यावेत.त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी समाधानी तथा आनंदी कसे करता येईल? अशी योजना अपेक्षित आहे!.

नांदेड जिल्हा विधी प्राधीकरणाच्या सचिव मा.न्यायमूर्ती दलजित कौर यांनी उद्घाटणपर भाषणात ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने पारित केलेल्या अनेक उपयुक्त कायद्यां विषयी विस्तृत माहिती दिली. जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनां केव्हाही त्वरित न्याय देण्यास कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनीं आपापले मृत्यूपत्र तयार करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तुमची आपत्ये तुम्हाला सांभाळत नसतील, त्रास देत असतील, अर्थिक सहाय करत नसतील, टाळा टाळ करत असतील तर कुणीही माझ्याकडे केव्हाही येऊ शकता. साध्या कागदावरही अर्ज करू शकता.लिहीता येत नसले वा पैशेही नसले तर मला तुम्ही भेटू शकता. तुमच्या समस्या मी सोडऊन देऊ शकते असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.अनेकांनी त्यांच्या फोनचा नंबर लिहून घेतला..

नांदेड जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे साहेबानी समाज कल्याण विगागाच्या वतिने सर्वतोपरी ज्येष्ठनागरिकांना सहकार्य करण्याचे अभिवचण दिले.अत्यंत खुमसदार शैलीत शासनाच्या सर्व योजनांबद्धल इतंभूत माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांबद्धल हे शासन फारच संवेदनशिल असल्याचे सांगितले.या पुढेही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ते शिबीरे तथा ज्येष्ठांचे मेळावे घेणार असल्याचे सांगितले.वयोश्री व तिर्थदर्शन योजनांबद्धल सविस्तर माहिती देऊन ज्येष्ठांना कुठेही व कसलीहि आडचण येऊ देणार नसल्याचे सांगीतले . शिबीरा साठीचा वेळही वाढऊन दिला व सर्वांनी या योजनेचा फायदा घेण्याचे त्यांनी सागीतले.

अध्यक्षिय समारोहात मा.अशोकजी तेरकरांनी ज्येष्ठ नागरीकांसांठी फेस्काॅमनी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा सांगून सध्याचे सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी अतिशय संवेदन शिल व तत्पर असल्याचे सउदाहरण सांगीतले.वयोश्री व तिर्थदर्शन योजनांचा ज्यास्तीत ज्यास्त ज्येष्ठ नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहान केले.. कार्यक्रमाचे सुत्र संचलण डाॅ.शितल भालके यांनी अतिशय नेटके व समर्पक केले. शेवटी अभार प्रदर्शशन प्रभाकर कुंटूरकर यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button