Tirthadarshan Yojana camp ; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची नांदेड येथे मोठ्या थाटात सुरूवात! – NNL
नांदेड| नांदेड मध्ये आज वैद्य रूग्णालय परिसरात मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची मोठ्या थाटा माटात सुरूवात झाली.
.नांदेड जिल्हा विधी प्राधिकरणाच्या न्यायमूर्ती मा.दलजितजी कौर जज यांच्या शूभ हस्ते दीप प्रज्वलनाने तथा भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प माल्यार्पणाने, फेस्काॅमचे मराठवाडा उत्तर प्रादेशिक विभागाध्यक्ष मा.अशोकजी तेरकर यांच्या अध्यक्षतेखाली, नांदेड समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे व फेस्काॅम उत्तरविभागाचे निर्माते (संस्थापकाध्यक्ष) मा. सुभाष रावजी बार्हाळे व सौ.निर्मलाताई बार्हाळे,सर्व श्री माधवराव पवार,जयवंत सोमावाड, रामचंद्रजी कोटलवार,डाॅ.लक्ष्मी पुरण शेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकीळ,श्रीमति चौधरी, देगावकर, शिंदे, जिंतूरकर इ. च्या प्रमुख उपस्थितित आणि मोठ्या संख्येनी जमलेल्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या साक्ष...
