नांदेडसोशल वर्क

Swachhata is a service campaign : स्‍वच्छता ही सेवा मोहिमेला सुरुवात गावस्‍तरावर व्‍यापक अभियान -NNL

नांदेड| केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोब 2024 या कालावधीत राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेचा आज जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांरगणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते हस्‍ते उद्घाटन करण्यात आले.

या वेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, ग्रामपंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, महिला व बाल विकास विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, कृषी अधिकारी विजय बेतीवार, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांना मिलिंद व्‍यवहारे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावर्षी मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आहे. गावात दृश्यमान स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या पंधरवड्यात या मोहिमेला गती देण्यासाठी गाव स्तरावर स्‍वच्‍छता विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्‍हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

स्वच्छता ही केवळ एक वेळेची कृती नसून ती आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असावी. शाश्वत स्वच्छतेच्या दृष्टीने गावातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असून त्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, आणि गावातील शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी प्रतिक्रिया प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button