नांदेडराजकीयव्हिडीओ

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

हिमायतनगर | हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट देत श्रीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात नुकत्याच पूर्ण झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

IMG 20260304 142255 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
Oplus_16908288

मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी मंदिर परिसरात पर्यटन विकास निधीतून सुमारे ५० लाख रुपयांच्या खर्चातून पेव्हर ब्लॉक बसविणे व टिन शेड उभारण्याचे काम करण्यात आल्याची माहिती दिली.

IMG20260304120924 01 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
oplus_0

दरम्यान, या विकासकामांमध्ये हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री डांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत संबंधित कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली.

IMG20260304125503 01 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
oplus_0

मंदिर विकास कामात शासन व मंदिर कमेटीची दिशाभूल करून जुन्या कोंक्रेटवर थेट चुरी टाकून पेव्हर ब्लॉकचे काम करून निधी लाटल्या गेल्याचा आरोप सुभाष वानखेडे यांनी केल्याने हिमायतनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

IMG20260304120025 01 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
oplus_0

आतातरी श्री परमेश्वर मंदिर विकासाच्या नावाखाली केल्या जाणारे सर्व शासकीय कामे मंदिर कमिटीच्या देखरेखित मंदिर कमेटीने स्वतः करून घ्यावे तरच शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास निधीचा खरा उपयोग होईल असे सुभाष यांनी म्हटले आहे.

IMG20260304124416 01 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
oplus_0

यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गणेश शिंदे, गजानन तुपतेवार, श्याम मारुडवार, उदय देशपांडे, सत्यवृत्त ढोले, संटी कप्पलवाड, मुखतार भाई, प्रभाकर क्षीरसागर, राजेश जाधव, रामभाऊ सूर्यवंशी, रमेश गुड्डेटवार, विकास नरवाडे, विनोद दुर्गेकर, संतोष गाजेवार, श्याम पाटील, गणेश राऊलवाड, यांच्यासह शिवसैनिक, नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

IMG20260304131420 01 Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
oplus_0

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!