Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

बिलोली/नांदेड| खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश्या विविध गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडून गजाआड केले. आणि बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा झाली होती. पोलिसांनी सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा कारागृह नांदेड येथे शिक्षा भोगण्याकरीता सोडले आहे.

खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश गुन्हयातील फरार आरोपीतां विरूध्द मा. न्यालयाने काढलेल्या पकड वॉरंटातील आरोपीस पकडुन त्याचे विरूध्द योग्य ती प्रतिबंधात्व कार्यवाही करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि. अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते.यातील फिर्यादी नामे गोदावरी हिने यांनी दिनांक 09 जून 2011 रोजी पोस्टे बिलोली येथे तक्रार दिली की, दिनांक 08 जून 2011 रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास ती भास्करनगर येथील घरात टी व्ही पाहत असतांना यातील आरोपी किरण शिवाजी तुडमे, वय 31 वर्षे, रा. भास्करनगर बिलोली हा हातात लोखंडी कत्ती घेवुन फिर्यादीच्या घरात आला. आणि धिंगाणा घालत टीव्ही व इतर सामानांची नासधूस केली. पोलीसांना सांगीतले तर तुकडे करण्याची धमकी दिली. तसेच त्याने मारण्यासाठी कत्ती उगारली तर तो वार चुकवुन ती पोलीस स्टेशनकडे पळाली.

आरोपीने तीच्या मुलीस थापड बुक्यांनी मारहाण केली. तसेच शेजारी बहीणीच्या घरात घुसून सुध्दा सामानाची नासधूस करून शिवीगाळ करून खत्तम करण्याची धमकी दिली. तसेच दिलीप भुरे यांच्या घरात घुसून सुध्दा सर्वाना मारून टाकण्याची धमकी दिली. पोलीस ठाणे बिलोली येथील पोलीस अधीकारी पांचाळ घटनास्थळ आले असता आरोपीने त्यांना सुध्दा जखमी केले. यावरून सदर आरोपी विरूध्द पोस्टे बिलोली गुरन 59/2011 कलम 452, 353 427, 332, 323, 504, 506 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोउपनि वाय एम शेख यांनी केला. सदर आरोपी विरूध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत, खंडणी वसुल या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तपासीक अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करून साक्षीदारांचे जाब जबाब व्यवस्थीत नोंदवुन सदर आरोपी विरूध्द मा. प्रथमवर्ग न्यायालय बिलोली कोर्टात दोषारोप पाठविण्यात आले होते. मा. न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. सदर शिक्षे विरूध्द आरोपीने मा. अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली येथे अपील केले होते. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश बिलोली मा श्री वि ब बोहरा यांनी पाच वर्षाची शिक्षा कायम करून दिनांक 20 जुन 2024 रोजी पकड वॉरंट काढले होते.

सदरआरोपीस पकडुन तुरूंगात शिक्षा भोगण्याकरीता टाकण्यासाठी वारंवार त्याचे राहाते घरी तपासले असता तो फरार झाल्याची माहिती मिळायची. म्हणुन मा. श्री हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमुन गोपनिय माहिती काढुन सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा कारागृह नांदेड येथे शिक्षा भोगण्याकरीता सोडण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. हानपुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी बिलोली, यांचे मार्गदर्शनाखाल पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकों मुददेमवार, पोना चंद्रमुनी सोनकांबळे, पोकों व्यंकट घोंगडे, विजय तुडमे अक्षय आचेवाड, यांनी अथक परिश्रम घेऊन चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button