नांदेड

Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

नवीन नांदेड| श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,सिडको 2 नवीन, नांदेड या आमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी विठ्ठल , रुक्मिणी व वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून शालेय परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली.

मिरवणुकीनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. १७ जुलै आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी शिवाजी विघालय हडको ने परिसरातील भागातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून विठ्ठल रुक्मिणी, वारकरी वेशभूषा,तुळशी घेतलेल्या व टाळ विणा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेशजी महागावे ,मु.अ. बिरादार,स.शि.पवार ,मजरे श्रीमती मिरकुटे,भोसले, डांगे, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

IMG 20240716 WA0034 Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडकोने मुलांत रूजवला वृक्षारोपनाचा अमुल्य संस्कार
आषाढी महोत्सवाचा आनंद द्विगुणित करत कुसुमताई माध्यमिक विद्यालयाने मुलांसमोर 500 सावली व फळझाडे लावण्याचा संकल्प केला होता. मुलांनी 700 झाडे आणून उच्चांक गाठला.प्रशालेतील असंख्य विध्यार्थी टाळकरी, वारकरी वेषात येऊन, हातात वृक्ष घेऊन झाडे लावा जीवन वाचवा,वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे,कोरोना काळ विसरू नका आक्सीजनविना मरू नका असा जयघोष देत मुलांनी वृक्षदिंडीत सहभागी होऊन सिडको-हाडकोतील वातावरण भक्तीमय तथा निसर्गमय झाला होता. पैसे मुलांचे, झाडे मुलांचे, लावणार आई-वडिलांच्या हस्ते, ते ही आपापल्या परीसरात कुसुमताई ने फक्त वृक्षलागवडीचा संस्कार दिला.

IMG 20240716 WA0035 Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

या उपक्रमासाठी संस्थेचे सचीव संभाजीराव बिरादार, मुख्याध्यापीका सौ शशिकलाताई जाधव- बिरादार यानी मार्गदर्शन केले तर पर्यवेक्षक शेख निजाम गवंडगावकर व सौ. उज्वला सावते यांनी वृक्षरोपनाचा संकल्प केला होता. या उपक्रमासाठी सांस्कृतिक प्रमुख विश्वास हंबर्डेसर, सौ वंदना सोनाळे ,सुर्यकांत वडजे,एस.डी .जाधव, नरसिंग यलमलवाड, सौ.चारूशीला देशमुख, लक्ष्मण येसके, युवराज शिंदे ,माधुरी माकणे यांनी परीश्रम घेतले.

शेख निजाम गवंडगावक कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने वृक्षारोपण
शंकरराव चव्हाण प्राथमिक विघालय असरजन येथे १०० वृक्षाचे वृक्षारोपण कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त मनपाचे सिडको सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

IMG 20240716 WA0037 Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

१६जुलै रोजी कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने शंकरराव चव्हाण प्राथमिक शाळा प्रांगणात १०० वृक्ष वृक्षारोपण लागवड करून संगोपन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश वडजे, शिक्षक तुकाराम पातेवार, सरपंच साहेबराव पवार, तुडमे डि वाय,जि.एस.कदम, एम व्हीवनंजे विठ्ठलराव रेड्डी एस बी कउटकर जाधव के डी यांच्या सह विधार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!