Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा

नवीन नांदेड l तब्बल विस वर्षांनंतर शालांत वर्गातील जवळपास पन्नास विध्यार्थी स्नेह मिलन नरहर कुरुंदकर विघालय जुना कौठा येथे 18 में रोजी संपन्न झाला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी, एकत्र आल्या नंतर जुना आठवणींना उजाळा मिळाला यावेळी सर्व गुरू जनांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नरहर कुरुंदकर हायस्कूल जुना कौठा नांदेड येथील 2004-05 मधील दहावी वर्गातील जवळपास 50 विध्यार्थी व विध्यार्थ्यांनी असलेल्या तुकडीचे 18 में रोजी स्नेह मिलन आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय पांडे,तर प्रमुख व्यंकटेश काटकर , उत्तम लाटकर ,शिक्षक केंद्रे,कमले,भोकरे,इंदुलकर, पूजारी, यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विध्यार्थी गणेश काकडे, मयुरी गादेवार, नितीन धाकपाडे,शंकर काकडे,संकेत कुलकर्णी, शुभांगी मुदखेडे,डॉ.संतोष सुकळकर,नेहा ऊदांवत, संतोष सुर्यवंशी,शाम मनाळकर,सदानंद अल्लमखाने, मिरा गजभारे, माधुरी गजाभारे,सुनिल गुंजाळे,मारोती वहिंदे,बाजीराव मोरे, बाबु गायकवाड, अतुल कळसकर, ज्ञानेश्वर निलेवार,सिमा तुडमे, ज्योती कोडांवर,ज्योती नळगे,पराजित पडा, कल्पना ऊडानशिव ,राजपाल कुंवर, माणिक पाटील, पद्माकर गुजावळे, मिनाक्षी परणाळे, ज्योती नळगे, रामचंद्र मोळके यांच्या सह यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरूजंनाचे आलेलं अनुभव सांगितले तर दहावी पास झाल्यानंतर घेतलेले उच्च शिक्षण व सध्या कार्यरत असलेल्या नौकरी पदावर परिचय करून दिला.


यावेळी स्नेह मिलन निमित्ताने जुन्या व नवीन आठवणीना ऊजाळा मिळाला तब्बल विस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गातील मित्र मैत्रिणी यांनी शाळेला शालेय साहित्य भेट दिली तर गुरू जनाचे आभार मानले,सुत्रसंचलन सुमन बुंदीले तर आभार मयुरी गादेवार यांनी मानले.




