First inspection of election expenses : भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL
नांदेड| भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकां नुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च...
