आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी अखेर पार पडला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोदी यांची इच्छा (काही जण याला अट्टाहासही म्हणतील) पूर्ण झाली. आता चर्चा सुरु झाली ती हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल काय़..? एकूण परिस्थितीचा विचार करता सध्या तरी या सरकारला कोणताही धोका दिसत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या तीन निवडणुकात जे यश मिळाले ते त्यांच्याच बळावर मिळाले यात संशय नाही. आपल्या बळावर सरकार येऊ शकते हे कळाल्यानंतर त्यांना नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करण्याची इच्छा झाली तर त्ते स्वाभाविकही आहे. तसे ते तिस-यांदा पंतप्रधान झाले. परंतु ते होताना पूर्वी सारखे यश त्यांच्या पक्षाला मिळाले नाही हेही वास्तव आहे. यापूर्वी मोदी भाजपाला मिळालेल्या पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होते. यावेळी त्यांना इतर पक्षाचा आधार (कुबड्या) ...
