क्राईमनांदेड

तालुक्यात गुटखा तस्करी जोमात पण अन्न प्रशासन विभाग मात्र कोमात; अर्थपूर्ण व्यवहारामुळे कार्यवाही मात्र शून्य -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाने केलेली गुटखाबंदी ही कागदपत्रीच किनवट आदिवासी व दुर्गम भागाचा फायदा घेऊन तालुक्यातील सारखणी बोधडी,इस्लापूर, शिवनी, ही मुख्य व्यापार पेठेशी संबंधित असलेली मोठी गावे आता गुटखा तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहेत . संबंधित गुटखा तस्करीचे धागेदोरे हिमायतनगर तालुक्यातील एका बलाढ्य व्यावसायिकाचे असल्याचे बोलले जाते.

या सर्व बाबीकडे अन्न प्रशासन विभाग मात्र झोपेचं सोंग घेऊनही बघ्याची भूमिका घेत आहे. शासनाने गुटखा,, केमिकल मिश्रित अन्नधान्य अनेक घातक पदार्थाला आळा बसावा यासाठी प्रशासनाची अन्न भेसळ यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हि यंत्रणा कार्यान्वित केली आहेत. पण अनेक दिवसापासून गुटखा, तस्करीचे व्यवसाय चालू आहेत. अनेक वृत्तपत्रातून वृत्तही प्रकाशित झाले. तरी संबंधित प्रशासन झोपेचे सोंग का घेतंय ? यावर कधीच मोठी कार्यवाही का होत नाही? हे न उलगडणार कोड सामान्य जनतेला पडले आहे.

याबाबत सविस्तर की, अनेक वर्षापासून गुटखा तस्करांचे केंद्रबिंदू असलेल्या सारखणी, इस्लापूर ,बोधडी, शिवणी या गावातील सुजान जनता आता वैतागली असून याचा छडा संबंधित प्रशासन का लावीत नाही? असा सवाल आता व्यसनात बळी पडलेल्या विद्यार्थी, युवा वर्गाचे पालक करीत असून संबंधित अन्नभेसळ यंत्रणा, पोलिस यंत्रणा का झोपेचे सोंग घेत बिनधास्त आहे.

या अवैध व्यवसायिकांच्या डोक्यावर कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा किंवा स्वयंघोषित पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीचा आहे. अशी जोरदार चर्चा आता वर्तुळात चालू झाली आहे. आज त्यांच्यामुळेच बहाद्दर तस्कराचे मनोबल वाढतच आहे. परिणामी शाळकरी मुले, युवा वर्ग याला बळी पडत आपले भावी जीवन उध्वस्त करून घेत आहेत. त्यांच्या काळ्या कमाईच्या लोभापायी इतरांचे जीवन मात्र बरबाद होत आहे. परिणामी त्यांचे पाप मात्र संबंधित गैर व्यवसाय करणारे यांना लागल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे..!

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button