सोशल वर्कनांदेड

Voter Awareness : क्रांतीदिनी मतदार जनजागरण अभियानाविषयी बैठक संपन्न

नांदेड| मतदार जनजागृती अभियान राबविण्याच्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट या क्रांती दिनी आनंद नगर नांदेड बैठक घेण्यात आली.

मतदार जनजागृती अभियान राबविण्याच्या अनुषंगाने सेवाभावी वृत्तीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठविधीज्ञ धोंडीबाराव पवार हे होते. एस एस इंटरप्राईजेस च्या कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस अनेक जण ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

मतदार जागृती विषयी आपापली मते यावेळी व्यक्त करण्यात आले. राज्यातील प्रसिद्ध कलावंत तथा नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शंकरपाळे यांनी मतदार जनजागृती अभियानात जिल्हा प्रशासनाला सामावून घेऊन कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसिद्ध कलावंत दिलीप खंडेराय यांनी अशा कार्यक्रमाचे निकडता असल्याचे व्यक्त केले.

या बैठकीत जनतेचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने आणि मतदारांना मतदान करण्याविषयी तसेच निस्पृह, निष्पक्ष, तटस्थ, निर्भीडपणे मतदान करण्याविषयी पत्रक काढण्याचे ठरले. या बैठकीचे शिस्तबद्ध आयोजन डॉ. शिवदास हमंद यांनी केले तर संचालन गोविंद मुंडकर यांनी केले. यावेळी बिलोली चे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण तुडमे यांची ही उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button