नांदेडआरोग्य

Dr. Sangita Deshmukh ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

नांदेड| जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन करण्यात आले आहे.

दरमहा ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येते. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील ७० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये २ हजार ८८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ ग्रॅम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या ६५ माता, डायबिटीस व तीव्र रक्तदाब असलेल्या ६ अशा एकूण ३३९ मातांना अति जोखमीचे निदान झाले, आणि त्यानुसार त्यांची संपूर्ण तपासणी व उपचार करण्यात आले.

या उत्कृष्ट कार्याची दखल राज्याच्या आयुक्त व संचालकांनी घेतली असून, नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी दर महिन्याच्या ९ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button