नांदेडकृषी

Leopard attack : हिमायतनगर : वारंग टाकळी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील मौजे वारंग टाकळी येथे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या शेतात बिबट्याने घुसून वगारीचा फडशा पाडला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

घटनास्थळी पावलांचे ठसे व प्राण्याच्या अवशेषांवरून बिबट्याच्या उपस्थितीची खात्री झाली असून, गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, वारंग टाकळी आणि आसपासच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनीही सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.

Oplus_16908288

गावकरी व शेतकरी वर्गाने वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरे लावावेत आणि पहारा वाढवावा अशी मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी अशोक हाके यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. वनविभागाने तातडीने तपास करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button