Politics Special ; अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..? -NNL
निवडणूक प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पाठविण्याची ही निवडणूक आहे. यातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोक प्रतिनिधी निवडायचे आहेत. काही पढतमुर्खांना हे अजून नीट समजलेले दिसत नाही. त्यांना वाटत असेल मंदिरात पुजारी पाठवायची ही निवडणूक आहे, म्हणून मंदिरात व मठात सनातनी महाराज लोकांना बोलाऊन पुजापाठ करुन निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यात येत आहे.
सर्व पक्षात नाक खुपसून झाल्यावर सर्वांचा जोरदार ठोसा खाऊन लालबुंद झालेले नाक घेऊन आता अपक्ष म्हणून राखीव मतदार संघात उभा राहिलेल्या एका मागासवर्गीय उमेदवाराने सगरोळी येथील एका मंदिरातून व मठातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. म्हणजे असे केल्याने लोक धार्मिक भावनेतून आपल्यालाच मतदान करतील असा गोड गैरसमज या उमेदवाराचा झाला असावा !
या आपल्या देशात दलितांना शिकण्याचा, लिहिण्याचा, रस्त्यावरुन चालण्याचा आ...
