लाईन ब्लॉक मुळे दोन रेल्वे रद्द -NNL

नांदेड| सिकंदराबाद विभागातील लाईन ब्लॉक मुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे —

रद्द करण्यात आलेल्या गाड्या : गाडी संख्या 07853 निझामाबाद ते नांदेड विशेष गाडी दिनांक 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर, 2022 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 07854 नांदेड ते निझामाबाद विशेष गाडी दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर, 2022 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

उशिरा धावणारी गाडी : या लाईन ब्लॉक मुळे गाडी संख्या 07197 काझीपेत ते दादर विशेष एक्स्प्रेस 130 मिनिटे उशिरा म्हणजेच दुपारी 13.40 वाजता सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती .

नांदेड-अमृतसर विशेष गाडीत बदल – नांदेड येथून 27 आणि 28 डिसेंबर ला सुटेल

या कार्यालयाने दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्रमांक 340 नुसार गाडी संख्या 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 23 आणि 24 डिसेंबर, 2022 ला रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल असे कळविले होते.

यात बदल करण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे — बदलानुसार, गाडी क्रमांक 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 27 आणि 28 डिसेंबर, 2022 ला रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल. प्रवाशांना विनंती आहे हा बदल लक्षात घ्यावा.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!