Saturday, May 30

Tag: gave her Class 12th paper

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

करियर, नांदेड
कंधार (सचिन मोरे) घरात दुःखाचे सावट, डोळ्यांत अश्रू आणि मनात वडिलांच्या आठवणींचा वेदनादायी पूर… अशा हृदयद्रावक प्रसंगातही शिक्षणाला प्राधान्य देत एका विद्यार्थिनीने जिद्दीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. हागदळ-गुगदळ (ता. अहमदपूर) मुळगाव भोजूचीवाडी ता. कंधार येथील कु. शिवानी माधव देवकत्‍ते (वय १७) हिने वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासांत बारावीच्या गणित विषयाचा पेपर देऊन सर्वांना भावूक केले. शिवानीचे वडील माधव भिमराव देवकत्‍ते हे पुणे येथे वाहन चालक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हागदळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच सकाळी अकरा वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचा गणिताचा पेपर होता. अंत्यसंस्कार आटोपताच, मनावर दग...
error: Content is protected !!