नांदेडराजकीयलातूर

Amit Deshmukh : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी घेतली बाभळगाव येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट

लातूर| राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, बुधवार दि. ४ जून रोजी सकाळी बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहर आणि जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटना, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या शांतपणे समजून घेतल्या. त्यांची निवेदने आणि निमंत्रणे स्वीकारून, संबंधितांना तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत झाली.

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे, गुरुनाथ ब्याळे, एन.आर. पाटील, रघुनाथ शिंदे, ॲड. राजेंद्र काळे, काँग्रेस पक्ष प्रभाग ६ अध्यक्ष गिरीश ब्याळे, बाभळगाव ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद देशमुख, डॉ. कल्याण बरमदे, ॲड. शरद देशमुख, संजय निलेगावकर, रोहिदास जाधव, महालिंग वाघमारे, अंकुश देशमुख, वामनराव देशमुख, रामकिशन तोडकर, निवृत्ती थडकर, मोहन आयरेकर, तात्यासाहेब देशमुख, महादेव जटाळ, सुरेंद्र धुमाळ, बळवंतराव पाटील, कलिमोद्दीन शेख, पप्पू घोलप, शिवाजी इंद्राळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button