Amit Deshmukh : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी घेतली बाभळगाव येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट
लातूर| राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, बुधवार दि. ४ जून रोजी सकाळी बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहर आणि जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटना, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या शांतपणे समजून घेतल्या. त्यांची निवेदने आणि निमंत्रणे स्वीकारून, संबंधितांना तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत झाली.
याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,...
