नांदेड

पावसाळयात धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध -NNL

नदीपात्र परिसर, जलाशय, पूरपरिस्थीती पुलांवर, पर्यटन स्थळावर कलम 144

नांदेड| नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या अनुषंगाने नदीपात्र परिसर, जलाशय, पूरपरिस्थीती पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे याठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 1 जुलै 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या वेळी नदीपात्र परिसरात, जलाशयावर, पूर परिस्थिती जन्य पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळांवर जावून गर्दी करणे तसेच छोटी वाहने घेवून जाणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे इत्यादी बाबींना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन प्रतिबंध करण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button