मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL
गोवा| भारताच्या कानाकोपर्यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे; मात्र सध्याच्या काळात मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत पडून रहाते, त्याचा धर्माला काही उपयोग होत नाही. दुसरीकडे पडझड झालेल्या जीर्ण मंदिरांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे भाविकांच्या दानाचा पैसा हा बँकेत पडून रहाण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरणे आवश्यक आहे. हे पुनर्निर्माणाचे कार्य करतांना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘समस्त महाजन संघा’चे कार्यकारी विश्वस्त श्री. गिरीश शहा यांनी केले. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी ते ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ यावर बोलत होते.
या प्रसंगी ‘मंदिराचे अर्थशास्त्र’ यावर बोलतांना श्री. अंकीत शहा म्हणाले, ‘‘विन...
