नांदेडकरियर

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सबंध देशभर सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय उपक्रमास महाराष्ट्र शासन तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनानुसार येथील सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 13 रोजी महाविद्यालयात प्रथमतः ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव तथा सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रा. कृष्णकुमार नेमानीवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विलोभनीय अशी मानवी साखळी करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. असंख्य विद्यार्थी. विद्यार्थिनी. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20240813 WA0022 Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त "हर घर तिरंगा" सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने केलेल्या आयोजनामध्ये शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप नगरपरिषद किनवट येथे करण्यात आला. यावेळी प्रभारी नगरपालिकेचे अधिकारी तथा सर्व कर्मचारी उपस्थित होते शहरातील वातावरण दुमदुमून टाकण्याचे काम यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अशा राष्ट्रीय घोषणा देत निर्माण केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो असे म्हणत विद्यार्थ्यांचा जल्लोष यावेळी किनवट शहरात दिसून आला.

या तिरंगा रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी तथा कार्यक्रमाधिकारी डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. मनोहर थोरात रामकिशन चाटे. डॉ. अजय किटे, डॉ. किरण आयनेनीवार तसेच डॉ. सुनील व्यवहारे प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ प्रा.तपनकुमार मिश्रा. डॉ. अण्णासाहेब सोळंके.प्रा विवेक चनमनवार, ग्रंथपाल माधवराव नेमानीवार महाविद्यालयाचे मुख्य व्यवस्थापक संजय संकनेनीवार, मधुकर ताडपेल्लीवार, गोविंद ताडपेलीवार यांच्यासह अनेक स्वयंसेवक स्वयंसेविका या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!