Draft Sand Exit Policy 2025 : वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध
मुंबई| शासनामार्फत वाळू/ रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण, दिनांक १६.०२.२०२४ व शेतामधील वाळू निर्गतीबाबतचे धोरण, दिनांक १५.०३.२०२४ अधिक्रमित करण्यात येऊन त्यामध्ये काही सुधारणा करुन प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ (Draft Sand Exit Policy 2025) चे प्रारुप हरकती/ सूचनेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ च्या प्रारुपाच्या अनुषंगाने काही हरकती, सूचना किंवा अभिप्राय सूचवावयाचे असल्यास https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेस्थळावर व deskkhal-sandpolicy@mah.gov.in या ई-मेलवर शुक्रवार, दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या हरकती/ सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे महसूल विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सु...
