नांदेडराजकीय

Ncp politics meeting : किनवट व माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

किनवट / माहूर प्रतिनिधी │आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी किनवट व माहूर येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व आमदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच किनवट-माहूर विधानसभेचे युवा नेते सचिन नाईक यांची विशेष उपस्थिती होती.

हिमायतनगर येथे बैठकीस जात असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी किनवट तालुकाध्यक्ष श्री. बाळू पवार यांनी तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांना स्कुटीची चाबी आमदारांच्या हस्ते प्रदान केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल बाळू पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

बैठकीदरम्यान श्री. संजय सिडाम यांना जिल्हा उपाध्यक्ष, तर श्री. विकास नाईक यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या माहूर येथील आढावा बैठकीत श्री. अमित राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

FB IMG 1762093435412 Ncp politics meeting : किनवट व माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

या बैठकीत किनवट-माहूर विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, भोकर विधानसभा अध्यक्ष शिवाजी पाटील लगलूदकर, हदगाव विधानसभा अध्यक्ष एकनाथ जाधव, भोकर तालुकाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड, किनवट तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार, माहूर तालुकाध्यक्ष विजय राठोड, हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सखाराम वाघमारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अफरोज पठाण, प्रदेश सरचिटणीस उत्तमराव सोनकांबळे, वैद्यकीय जिल्हाध्यक्ष अमोल मालेगावकर, तसेच शहराध्यक्ष व अन्य जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही ठिकाणी झालेल्या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षशक्तीत भर घातली. या आढावा बैठका उत्साहात आणि ऐक्यभावनेने संपन्न झाल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!