नांदेडलाइफस्टाइल

Drug free India : नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ

नांदेड l नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली.

नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५ मध्ये ५ वर्ष पूर्ण झाली असून पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ घेऊन कर्मचाऱ्यांनी सदर वेबसाईटवर त्यांची नोंदणी करून सदरील प्रमाणपत्र डाऊनलोड केली आहेत. या कार्यक्रमात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (१२१), गोविंदराव पऊळ नर्सिंग स्कूल हदगाव (३४), दगडोजीराव पाटील नर्सिंग स्कूल हदगाव (४५), वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर कंधार (१७८), उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालय नांदेड (२१), ग्रामीण टेक्नीकल इन्स्टिट्यूट नांदेड (१८२).

सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पांगरी (४२) तसेच जनाई नर्सिंग स्कूल किनवट (२०) या सर्व महाविद्यालयातील एकूण ६४३ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन नशामुक्तीची शपथ घेतली. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी नशामुक्तीची शपथ घेऊन प्रमाणपत्र नोंदणी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button