इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL
नांदेड,बिलोली, गोविंद मुंडकर। इंग्रजी माध्यमांच्या शाळातील मराठी अमृतवाणी हे पुस्तक यातील चुका यामुळे पालक आणि विद्यार्थी यासह शिक्षकात गोंधळ निर्माण झाला आहे. इयत्ता तिसरीच्या अमृतवाणी यातील *कुशाग्र राजा* या पाठातील प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा यातील दोष शिक्षण विभागाने का दूर केले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गाढवाच्या ऐवजी म्हशीचा उल्लेख करून शिक्षण क्षेत्रातील गाढवाचा गोंधळ चर्चेला आला आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनींना मराठी शिक्षण आणि त्याविषयीचे ज्ञान सुलभ पद्धतीने अवगत करण्यासाठी विविध संशोधन केले जातात. शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे इंग्रजी माध्यमातील मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकात त्रुटी नव्हे तर अनेक दोष आढळून आले आहेत.
राज्य प्रकल्प समन्वयक श्री भाऊ गावंडे यांनी महाराष्ट्र शासन यांच्यावतीने युनिसेफ उपक्रमा...
