
नांदेड| अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद जिल्हा शाखा नांदेडची व्यापक बैठक रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


प्रयागगंगा, प्रकाश नगर समोर, विजयनगर, तरोडा बु. नांदेड येथे आयोजित या बैठकीत १) वधू वर परिचय मेळावा आयोजित करणे, २) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेणे, ३) समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे नियोजन करणे, ४) संत रविदास गृहनिर्माण संस्थेची शासनाने परत घेतलेली जागा पुनःश्च मिळवण्यासाठी रुपरेषा ठरविणे, ५) नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करणे तसेच ६) आरक्षणाचे वर्गीकरण हे विषय ठरविण्यात आले आहेत. या बैठकीस समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार, लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे आणि सामाजिक कार्यकर्ते शिवानंद जोगदंड हे विषयानुरुप सविस्तर मार्गदर्शन करतील.

या व्यापक बैठकीस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवारत व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सर्व समाज बंधू भगिनींनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे, भीमराव वाघमारे, संजय बनसोडे, जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर, जिल्हा संघटक संतोष सुर्यवंशी, दिगांबर जमदाडे, नागनाथ कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष बोराळकर, नांदेड महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, नांदेड उत्तर महानगर अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, तालुकाध्यक्ष रमेश गंगासागरे, मनोज सुरजकर, देविदास गंगासागरे, बालाजी कांबळे, ॲड. नितेश बनसोडे, दशरथ डोंगरे, माधव गंगासागरे, विनोद गंगासागरे, दशरथ गोणारे, माधव सुर्यवंशी, लक्ष्मण फुलवरे, अमृत हराळे, धारबा सोनटक्के, अशोक गंगासागरे, सुनिल कांबळे आदींनी केले आहे.





