सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

सेंद्रिय शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी निवेदन

नांदेड। शेतकरी फामर्स प्रोड्युसर कं. लि. सन २०२४-२५ वर्षासाठी सेंद्रीय एनपिओपी मानकानुसार प्रमाणित झाली आहे कंपनीचे ४८ शेतकरी सदस्य आहेत. तसेच नदिड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक सेंद्रिय शेतकरी आमच्या सोवत सभासद होत आहेत. त्यानुसार भविष्यातही आम्ही हि सेंद्रिय शेती चळवळ आपल्या जिल्ह्यात राबवावी यासाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर च्या वतीने कंपनीचे संचालक श्री भगवान इंगोले व जी – नेक्स्ट ऑर्गानिक सेल्स अँड सर्विसेस चे संचालक श्री हर्षल जैन यांनी सेंद्रिय शेतीसाठी पूरक असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन आत्मा चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बोराटे यांना देण्यात आले आहे.

या निवेदनाव्दारे सेंद्रीय उत्पादित भाजीपाला तसेच इतर उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरुपी नांदेड शहर व तालुका ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच सेंद्रिय शेतकऱ्यांना निंबोळी भरडण्यासाठी मशीन अनुदानात्मक उपलव्ध करुन द्यावी आणि हिरवळीचे खते जसे उँचा, बरू इतरचे बियाणे शासनामार्फत उपलब्ध करुन द्यावे व सेंद्रिय शेतकऱ्यांना जिवाणू कल्चर खते तसेच सेंद्रिय निविष्ठा अनुदानात्मक स्वरुपात उपलब्ध करुन द्यावे.

(रॉड फस्फेट, जिपस्म, भूसुधारक) तसेच सेंद्रिय शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित माल साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र गोदाम उपलब्ध करुन द्याव आणि सेंद्रिय शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रिय मालाचा ब्रँड तयार करण्यासाटी पॅकोंग मशिन व लेवलिंगसाठी अर्थ सहाय्य करण्यात यावे यासह विविध सेंद्रीय शेती पूरक यंत्रणा निर्मितीसाठी या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत अशी माहीती कृषी तज्ञ हर्षल जैन यांनी यावेळी दिली .

सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्मितीबाबत अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की संद्रिय शेतकऱ्यांना त्यांच्या प्रमाणिकरणासाठी अर्थ सहाय्य करावे संद्रिय शेतकऱ्यांचा विशेष प्रशिक्षण वर्ग घेत गेल्या जावेत व सेंद्रिय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी / एक्स्पोर्ट साठी जिल्हा उद्योग केंद्रातून विशेष प्रशिक्षण दिले जावे. आणि आपल्या जिल्ह्यात एपेडा प्रमाणित तसेच एनएबिएल मान्यताप्राप्त टेस्टिंग लॅब शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात यावी अशी मागणी सेंद्रीय शेती तज्ञ श्री हर्षल जैन यांनी केली आहे …

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button